NCB LOGO

एनसीबीने दोन दिवस सातत्याने केलेल्या कारवाईत विविध ठिकाणांहून ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. दोन परदेशींसह सात ड्रग्ज पॅडलर्सला अटक करून त्यांच्याकडून कमर्शिअल कॉन्टीटीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबईचे एनसीबीचे उप संचालक समीर वानखडे यांनी सांगितले की, जोगेश्वरी पश्चिम येथून अबु सुफियान खानला अटक केली आहे. हा कुप्रसिद्ध हिस्ट्रीशीटर आहे आणि जोगेश्वरीत एमडीचा प्रमुख पॅडलर आहे.

    मुंबई : नार्कोटिक्स कट्रोल ब्यूरोने (एनसीबी) सातत्याने कारवाई करत शनिवारी दोन परदेशी महिलांसह सात ड्रग्ज पॅडलर्सला अटक केली आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी छापे टाकून १५ ड्रग्ज तस्करांना अटक होती. यात ३ नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे. एनसीबीने या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळते आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.

    एनसीबीने दोन दिवस सातत्याने केलेल्या कारवाईत विविध ठिकाणांहून ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. दोन परदेशींसह सात ड्रग्ज पॅडलर्सला अटक करून त्यांच्याकडून कमर्शिअल कॉन्टीटीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबईचे एनसीबीचे उप संचालक समीर वानखडे यांनी सांगितले की, जोगेश्वरी पश्चिम येथून अबु सुफियान खानला अटक केली आहे. हा कुप्रसिद्ध हिस्ट्रीशीटर आहे आणि जोगेश्वरीत एमडीचा प्रमुख पॅडलर आहे.

    वसई आणि नालासोपारा पूर्वेतून दोन कारवायांमध्ये रफीक मोहम्मद अली शेख आणि नायझरीन नागरिक जॉनसेन माका या दोघांना पकडून त्यांच्याकडून चरस आणि गांजा जप्त केला आहे. गोरेगाव पश्िचममधून इरफान इकरामुद्दीन शाखन, खारघरमधून किंग्सले उकुवेजा आणि मीरा रोडमधून रियास इकबाल टंडेलाला अटक केली आहे.

    गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) खार, धारावी व दिंडोशीत केलेल्या कारवाईतून सव्वाचार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. यात तरुणांना कोकेन पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकालाही बेड्या ठोकल्या आहेत. इनोसेंट लोरेन्स (वय ३३) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय टोळीत सक्रिय आहे. एएनसीच्या वांद्रे कक्षाने खारमधून लोरेन्सला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी ९० लाख किमतीचे १ किलो ३०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

    आझाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईत २४ ऑगस्टला मालाडच्या अशरफ अजगर सय्यद (३०) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ८ हजार रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. त्याच्या चौकशीत हे ड्रग्ज मोहम्मद इरफान शेख याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने शेखला अटक केली. त्याच्याकडे १६ लाख २० हजार रुपये किमतीचे चरस सापडले. दोन्ही कारवायांत एकूण २६ लाख २८ हजार किमतीचा १ किलो ३१४ ग्रॅम साठा मिळाला. तो बिहारमधून चरस आणून त्याची विक्री करत होता.