भाजप विरोधात देशात सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील, मात्र कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे नाही : नबाब मलिक

ष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही प्रचाराची जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणऩितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी प्रदिर्घ भेट झाली त्याबाबत मलिक यांनी हा खुलासा केला आहे.

    मुंबई : भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही प्रचाराची जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणऩितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी प्रदिर्घ भेट झाली त्याबाबत मलिक यांनी हा खुलासा केला आहे.

    भाजपविरोधी आघाडीची चर्चा झाल्याचे स्पष्ट

    मलिक यांच्या या खुलाश्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून भाजपविरोधी आघाडी तयार करण्यासाठी पवारांच्या भेटीत याच मुद्दयावर चर्चा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ही आघाडी करताना त्यात कोणते पक्ष येऊ शकतात, भाजपविरोधी भूमिका घेण्यास टाळणारे इतर पक्ष, नेत्यांना कसे जवळ आणता येईल, यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

    भाजप विरोधी सशक्त मोर्चासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील

    मलिक यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारसाहेबांना दिली. ते म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवार साहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.