ऐतिहासिक पार्श्वभुमीच्या नेत्यांना उभे करत मराठा ओबीसी आणि वंचितचा नवा प्रयोग; नव्या रणनीतीची चर्चा

महाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वेगळ्या पक्षाच्या भुमिकेबाबत पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे इतर मागास वर्गीयांचे आरक्षण आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबतही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होणा-या सामाजिक ध्रुवीकरणाचा मागोवा घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे जनक राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वेगळ्या पक्षाच्या भुमिकेबाबत पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे इतर मागास वर्गीयांचे आरक्षण आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबतही आगामी निवडणुकांच्या दृष्टीने होणा-या सामाजिक ध्रुवीकरणाचा मागोवा घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    राज्यात २०१९ च्या निवडणुकीत भाजपने वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करत दोन्ही कॉंग्रेस पक्षांना धोबीपछाड दिला होता. लोकसभा, आणि नंतर विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम मतदानात दिसून आला होता.

    राज्यात २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजनच्या अनेक जागा केवळ काही हजार मतांनी पडल्या होत्या. मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने सर्वसमाज ढवळून निघत असताना प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांच्या सारख्या ऐतिहासिक पार्श्वभुमीच्या नेत्यांना उभे करत मराठा ओबीसी आणि वंचित समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न संघ आणि भाजपच्या धुरीणांकडून चालविला जात असल्याचे दिसून येत आहे.

    त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग करत भाजप विरुध्द सगळे या समिकरणाला जातीय समिकरणातून छेद देण्याची नवी रणनीती तयार होत असल्याबाबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे असे या सूत्रांनी सांगितले.