एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी, पक्षांतराचा मुहूर्त टळला

भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. परंतु आता पक्षांतराचा मुहूर्त टळला (avoid)असला तरी खडसे राष्ट्रवादीत पक्षांतर नक्की करतील, अशी माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे (NCP)नेते मौन बाळगून आहेत. त्याबरोबर एकनाथ खडसे यांनी याबाबत चुप्पी साधली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकजण संभ्रमात आहेत.

 मुंबई: भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. परंतु आता पक्षांतराचा मुहूर्त टळला (avoid)असला तरी खडसे राष्ट्रवादीत पक्षांतर नक्की करतील, अशी माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे (NCP)नेते मौन बाळगून आहेत. त्याबरोबर एकनाथ खडसे यांनी याबाबत चुप्पी साधली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकजण संभ्रमात आहेत.

जळगावात काल शुक्रवारी खडसेंनी ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स’ असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्री देण्यात येणार असल्याच्या चर्चा असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती.

सध्या कृषी मंत्रीपद हे शिवसेनेकडे असून, सेनेचे दादा भुसे हे कृषी मंत्री आहेत. तसेच शिवसेनेकडे असलेले कृषी मंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.