राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बुधवारी आढावा बैठक

आजी माजी आमदारांच्या या बैठकीत विजयी आणि पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मागील दोन वर्षात म्हणजे २०१९ विधानसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत आप आपल्या मतदारसंघात प्रतिनिधींनी कोणकोणते कामं केली आहेत, याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

    मुंबई : २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले आणि पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती मात्र, शरद पवार यांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. परंतू आता ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

    या बैठकीत विजयी आणि पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मागील दोन वर्षात म्हणजे २०१९ विधानसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत आप आपल्या मतदारसंघात प्रतिनिधींनी कोणकोणते कामं केली आहेत, याचा लेखाजोखा मांडला जाणार आहे. असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

    दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील मंत्री यांच्या कामाबद्दल सुद्धा आढावा घेतला जाण्याची शक्यता असल्याचं समजते.