uddav thackery and sharad pawar

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी काल रात्री बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) विषयावर त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. तसेच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं होतं. पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं होतं.

कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल, असं ते म्हणाले होते.

मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. असे शरद पवार म्हणाले.