राष्ट्रवादीची डोकेदुखी संपेना, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंची उद्या ईडी चौकशी, खडसे काय करणार याकडे लक्ष

भाजपातून राष्टवादीत आलेले एकनाथ खडसे यांची उद्या मुंबईत ईडी चौकशी होणार आहे. भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे. या भूखंड प्रकरणामुळेच फडणवीस सरकारच्या काळात खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर संकटांचा मारा सुरू असल्याचे दिसते आहे. बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत. अल्पसंख्यांकमंत्री नवब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केल्याने तेही अडचणीत सापडलेले असताना, राष्ट्रवादीचे आणखी एक नेते उद्या चर्चेत येणार आहेत.

भाजपातून राष्टवादीत आलेले एकनाथ खडसे यांची उद्या मुंबईत ईडी चौकशी होणार आहे. भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे. या भूखंड प्रकरणामुळेच फडणवीस सरकारच्या काळात खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

आता याच प्रकरणी ही चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यानंतर खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते.

आता त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यामुळे उद्या त्यांना हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहे. एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. खडसे यांना चौकशीसाठी दिसऱ्यांदा समन्स बजावले असल्याने त्यांना उपस्थित रहावेच लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.