आज राष्ट्रवादीची शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक, तर भाजपाची कोअर कमिटीची बैठक

शेजारी राज्य असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणूका पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. शिवसेनेने गोवा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असताना, आता भाजपने देखील निवडणुकांचं रणशिंग फुकलं आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ आणि १५ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांसाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा असणार आहे. १३ तारखेला देवेंद्र फडणवीस गोव्यात जाणार आहेत. १३ आणि १४ तारखेला फडणवीस गोव्यात असणार आहेत.

    शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, आयकर विभागाच्या छापेमारीवर खलबताची शक्यता, तर निवडणुकांच्या रणनितीसाठी भाजप कोअर कमिटीची खलबतं सुरु आहेत. त्यामुळे ही निवडणूकांची नांदी आहे का? राज्यात लवकरच विधानसभेच्या लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    तर, दुसरीकडे शेजारी राज्य असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. या निवडणूका पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. शिवसेनेने गोवा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असताना, आता भाजपने देखील निवडणुकांचं रणशिंग फुकलं आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ आणि १५ ऑक्टोबरला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्याच्या निवडणुकांसाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा असणार आहे. १३ तारखेला देवेंद्र फडणवीस गोव्यात जाणार आहेत. १३ आणि १४ तारखेला फडणवीस गोव्यात असणार आहेत.

    भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटनात्मक दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सोमवारी राज्याच्या निवडणूक संघासोबत दीर्घ चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील काही काळ बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीत, पुढील १०० दिवसांसाठी कार्यक्रम तयार करण्याबरोबरच, ते जनतेपर्यंत सकारात्मकतेने पोहचण्यास सांगितले आहे. राज्याच्या सर्वसमावेशक राजकीय आढाव्यासह, लखीमपूर खेरी घटना आणि त्याचे परिणाम यावरही बैठकीत चर्चा झाली.

    हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या बैठकीत, पुढील १०० दिवसांसाठी ब्लू प्रिंट तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख तैनात करणे, अर्धा डझनहून अधिक सामाजिक परिषदा आयोजित करणे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी कार्यक्रम चालवण्याचे सांगितले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.