राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे पीए ते गृहमंत्री; सात वेळा आमदार आणि अनेक मंत्रीपद सांभाळणाऱ्या वळसे पाटलांचा राजकीय प्रवास

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे पीए अर्थात स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या वळसे पाटलांनी पार पाडल्यात. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते शरद पवरांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे व्यक्तीमत्व म्हणूनही ओळखले जातात.

  मुंबई : अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंतीपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृह विभागाचा कार्यभार विद्यमान उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंरह कोश्यारी यांना पाठविलेल्या पत्रात, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असे म्हटले आहे.

  याचबरोबर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबतही विनंतीही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे पीए अर्थात स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या वळसे पाटलांनी पार पाडल्यात. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते शरद पवरांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे व्यक्तीमत्व म्हणूनही ओळखले जातात.

  30 ऑक्टोबर 1956 रोजी दिलीप वळसे पाटील यांचा जन्म झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत.

  युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.
  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.