राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? राष्ट्रवादी काँग्रेसची ‘सुपर १००’ मोहिम हाती

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे. भाजपाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे.

    मुंबई –  एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यात दौरा करून आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरं जावं असं म्हटलं आहे. यातच आत शिवसेनेने काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल असं सांगितले आहे.

    शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे. भाजपाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेने राज्यात सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत ३४ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३४ पदाधिकारी राज्यातील १०० मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रैस मजबूत करण्याचं काम करतील