सर्व मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज, विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

संभाजीराजे यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असंही विखे-पाटील यांनी म्हटलंय.

    सरकारमधील मंत्री जी विधानं करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावं. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं, असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलंय.

    संभाजीराजे यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असंही विखे-पाटील यांनी म्हटलंय.

    मंत्र्यांनी अनेकदा मदतीची घोषणा केली मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करुन 5 लाखांची मदत दिली. म्युकरमायकोसिस रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प आहे. यात इजेक्शनचा खर्चही भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी राज्य सरकारवर टीका केलीय.