भावनिक आव्हानापेक्षा, संवादापेक्षा गतीने आणि क्षमतेने काम करण्याची आवश्यकता : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर दरेकरांचा सल्ला!

कोरोना वाढत आहे परंतु आपण लोकांच्या मनात भीती निर्माण करू नका. दहशतीचे वातावरण निर्माण करू नका, जुलमी राजवट आहे अशा प्रकारची कृती सरकारी कार्यरत म्हणून, अधिकारी म्हणून प्रशासक म्हणून जाता कामा नये असे ते म्हणाले.

    मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे भावनिक आव्हानापेक्षा, संवादापेक्षा गतीने आणि क्षमतेने काम करण्याची आवश्यकता ठाकरे सरकारला आहे. इतर राज्यात कोरोना संपुष्टात आला आहे, इतर राज्यांनी आरोग्यव्यवस्था क्षमतेने आणि ताकदीने केली परंतु निश्चित कोरोना रोखण्यात महराष्ट्रात ठाकरे सरकार कमी पडले आहे.

    ठाकरे सरकार कमी पडले

    आर्थिक दृष्ट्या कोरोना काळात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले होते, अनेक राज्यांनी निधी जाहीर केला, राज्यात कमी निधी जाहीर करण्यातही ठाकरे सरकार कमी पडले आहे. कोरोना वाढत आहे परंतु आपण लोकांच्या मनात भीती निर्माण करू नका. दहशतीचे वातावरण निर्माण करू नका, जुलमी राजवट आहे अशा प्रकारची कृती सरकारी कार्यरत म्हणून, अधिकारी म्हणून प्रशासक म्हणून जाता कामा नये असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वेगवेगळी वक्तव्य करत आहेत, त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही असे दिसून येत आहे असे निरीक्षण दरेकर यांनी नोंदविले.

    भीतीपेक्षा धीर देणे गरजेचे

    दरेकर म्हणाले की, लॉकडाउन करू, दंड वाढवू भीतीच वातावरण सरकारने करण्यापेक्षा लोकांना आधार आणि धीर देण्याची आवश्यकता आहे. लोकांना गर्दी करू नका सांगत असताना, लोकांना नियम शिकवत असताना सरकारमधील नेते लग्नसोहळा, कार्यक्रमाला जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारमधील नेत्यांना नियम पाळण्याची व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.