students allowed local travel

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष गाड्या सोडून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पालकांकडून होत होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगरी आणि रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET Exam 2020) ही परीक्षा आज रविवार १३ सप्टेंबरला होणार आहे. एकाच सत्रात, एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी देतील. त्यासाठी राज्यात ६९५ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना (Corona) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर तपासणी आणि सॅनिटायनेशनला (sanitation) प्राधान्या दिले जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश वेळेतच केंद्रावर पोहचावे.

परीक्ष सुरु होण्याआधी किमान एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर थ्री प्लाय मास्क देण्यात येतील. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये ८ फुटांचे अंतर राहणार आहे. मोठ्या सोलचे बूट. चप्पल व मोठ्या बटनांचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. परीक्षेसाठी जारी करण्यात आलेले मूळ ओळखपत्र विद्यार्थ्यांनी सोबत ठेवायचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची कॉपी केल्यास परीक्षा केंद्रावर वैध मानले जाणार नाही.

विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात विशेष गाड्या सोडून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पालकांकडून होत होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगरी आणि रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांना लोकलने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच प्रवेशपत्राच्या आधारे त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे.