sushant viscera

मेडिकल बोर्डाने सुशांतने फाशी घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. सुशांतचा व्हिसेराचा नमुनाही पोस्टमार्टम दरम्यान घेण्यात आला. व्हिसेरामध्ये यकृत, स्वादुपिंड आणि मृत व्यक्तीच्या आतड्यांसारख्या अवयवांचे अंतर्गत भाग असतात.

मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यूचा (Sushant singh Rajput) तापासात आता एक नवीन खुलासा (reveals) झाला आहे. सुशांतचा विसेरा नीट जतन केला नव्हता. मीडिया रिपोर्टनुसार सुशांतच्या व्हिसेरा (Sushant’s viscera) प्रेझर्वेशनमध्ये निष्काळजीपणाचा (Negligence in preserving Sushant’s viscera) आरोप आहे. मुंबई (Mumbai) मधील सुशांतच्या व्हिसेराच्या सॅम्पलपैकी जवळपास ८० टक्के नमुन्याचा तपास मुंबईत करण्यात आला आहे आणि एम्सच्या (AIIMS) तज्ज्ञांना तपासणीसाठी केवळ २० टक्के नमुने सापडला आहे.

एम्सच्या तज्ज्ञांचा सुशांतचा व्हिसेरा तपासणी अहवाल लवकरच समोर येऊ शकेल. हा अहवाल सीबीआयच्या तपासणीसाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सुशांतच्या व्हिसेराची तपासणी करणारे फॉरेन्सिक तज्ञांचे एक पथक एम्सच्या डॉक्टरांच्या समितीकडे अहवाल सादर करेल, ज्याचा निष्कर्ष सीबीआयला कळविला जाईल.

सुशांतचे पोस्टमॉर्टम मुंबईतील कूपर रुग्णालयात झाले. रुग्णालयाच्या ५ डॉक्टरांच्या मंडळाने १५ जून रोजी शवविच्छेदन केले. मेडिकल बोर्डाने सुशांतने फाशी घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले होते. सुशांतचा व्हिसेराचा नमुनाही पोस्टमार्टम दरम्यान घेण्यात आला. व्हिसेरामध्ये यकृत, स्वादुपिंड आणि मृत व्यक्तीच्या आतड्यांसारख्या अवयवांचे अंतर्गत भाग असतात.

सुशांतच्या मृत्यूवरील मुंबई पोलिसांच्या तपासणीनुसार सुशांतने आत्महत्या केली. तर अनेक माध्यमांनी मुंबई पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अभिनेताच्या मृत्यूचे कारण काहीतरी वेगळंच आहे, अशी अपेक्षा सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते व्यक्त करत आहेत. सीबीआय सध्या प्रत्येक पैलूवरून अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करत आहे.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी एक व्हिडिओ स्टेटमेंट प्रसिद्ध केले असून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर त्यांनी आरोप केला आहे की, ती सुशांतला बराच काळ विष प्राशन करत होती. केके सिंह यांनीही एजन्सीकडून रियाच्या अटकेची मागणी केली होती. पण सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात आलेल्या ड्रग्स अँगलनंतर, तपासात सामील झालेल्या एनसीबीने ड्रग्जचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर रियाला अटक केली. रिया सध्या भायखळा कारागृहात आहे.