”नेफ्रोप्लस” यावर्षी करणार २००० पेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचार्‍यांची भरती

मुंबई : भारतात डायलिसिस केंद्रांचे सर्वात मोठे आणि विस्तृत जाळे असलेल्या हैदराबाद स्थित कंपनी, नेफ्रोप्लसने आगामी १२ महिन्यांमध्ये २००० पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचारी भरती करण्याची आपली

 मुंबई :  भारतात डायलिसिस केंद्रांचे सर्वात मोठे आणि विस्तृत जाळे असलेल्या हैदराबाद स्थित कंपनी, नेफ्रोप्लसने आगामी १२ महिन्यांमध्ये २००० पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचारी भरती करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. आपला कार्यविस्तार संपूर्ण भारतभर करण्याची कंपनीची आक्रमक योजना असून त्यातूनच आगामी काळात डायलिसिस तंत्रज्ञांची अफाट मागणी वाढेल असे समजते.

कंपनीला खात्री आहे की, भारताकडे देशांतर्गत कुशल तंत्रज्ञांचा तुटवडा आहे आणि म्हणून कंपनीने तिच्या एनपिडीया प्रशिक्षण संस्थेच्या फ्रेंचायझींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१२ मध्ये सुरू झालेली एनपिडीया एक अत्याधुनिक पॅरामेडिकल (रुग्णसेवा) प्रशिक्षण संस्था असून तिला डायलिसीस तंत्रज्ञ या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त आहे. एनपिडीया, हेमोडायलिसिसवर विशेष लक्ष केंद्रीत करीत, डायालिसीसमध्ये पदविका पदवी प्रदान करते.  यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारक किंवा ज्यांच्याकडे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आहे असे इच्छुक अर्ज करू शकतात; आरोग्यसेवेतील पूर्वानुभवाची आवश्यकता नाही तर भारतातील सर्वोत्कृष्ट प्रमाणीत प्रशिक्षकांद्वारे सैद्धांतिक ज्ञान (theoretical knowledge) आणि व्यावहारिक प्रशिक्षण (practical training) या दोन्हीही प्रमुख गोष्टीसाठीया अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. डायलिसिस पदविका हा १५ महिन्यांचा अभ्यासक्रम असून त्यात वर्गात दिले जाणारे तसेच प्रत्यक्ष कार्यस्थळावर दिले जाणारे प्रशिक्षण यांचा अंतर्भाव आहे.सदरची संस्था हि बोर्ड ऑफ नेफ्रोलॉजी एक्झामिनर्स नर्सिंग टेक्नॉलजी (BONENT), यू. एस. ए. च्या परीक्षा घेण्यासाठी आणि प्रमाणपत्र देण्यासाठी एकमात्र मान्यताप्राप्त संस्था आहे. BONENT चे प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर हे तंत्रज्ञ, यू एस, मध्य पूर्व सहीत, संपूर्ण जगात कार्य करू शकतात.  

नेफ्रोप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  विक्रम वुप्पला यांनी रुग्णसेवा कर्मचारी भरती आणि प्रशिक्षण याबद्दल सांगितले की, ”जागतिक स्तरावरील उत्कृष्ट डायलिसिस सेवा येथे आपल्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी नेफ्रोप्लस तत्पर आणि प्रयत्नशील आहे.  गेल्या काही वर्षांत आम्हाला जाणवले की, भारतात प्रशिक्षित आणि प्रमाणित डायलिसिस तंत्रज्ञांचा कमालीचा तुटवडा आहे आणि देशातील ही उणीव भरून काढण्याचे उद्दीष्ट ठेवून एनपिडिया प्रशिक्षण संस्थेची उभारणी करण्यात आली.