सुशांत मृत्यू प्रकरणात नवा दावा; ईडीला मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळाले नाहीत

मुंबई (Mumbai). बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एकानंतर एक अनेक दावे चुकीचे ठरत आहे. सर्वप्रथम एम्सच्या पॅनलने हत्येची शक्यता फेटाळली होती. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे न मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

  • अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिली माहिती

मुंबई (Mumbai). बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एकानंतर एक अनेक दावे चुकीचे ठरत आहे. सर्वप्रथम एम्सच्या पॅनलने हत्येची शक्यता फेटाळली होती. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे न मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबाकडून गैरसमजातून आरोप केले होते, असे ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ईडीच्या सूत्रांनी म्हटले आहे की, सुशांतच्या कुटुंबाला फायनान्सविषयी काहीच कल्पना नव्हती. याच कारणामुळे त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा संशय होता. ईडीला सुशांतच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग किंवा संशयास्पद व्यवहारांचा पुरावा सापडला नाही; परंतु खात्यांमधून झालेल्या छोट्या-मोठ्या व्यवहाराचा तपास केला जात आहे. हे व्यवहार कुणासोबत आणि का करण्यात आले याची माहिती मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

जवळपास २.७८ कोटी रुपये टॅक्समध्ये भरले
सुशांतच्या बँक खात्यातून २.७८ कोटी रुपये करापोटी (जीएसटी सह) देण्यात आले होते. तर छोटी-मोठी रक्कमही मिसिंग आहे, असे ईडीला तपासात आढळल्याचे सांगितले जात आहे. तपास एजेंसी याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. ईडीला रिया चक्रवर्तीच्या खात्यामध्ये सुशांतच्या खात्यांमधून एखाद्या मोठ्या अमाउंटचे थेट ट्रान्जेक्शन सापडलेले नाही. या दोघांमध्ये छोट्या-मोठ्या पैशांची देवाण-घेवाण होऊ शकते, असे ईडीला आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.