MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर, आता या दिवशी होणार परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी पूर्वपरीक्षा आता २१ मार्च या दिवशी घेतली जाणार आहे. ही परीक्षा १४ मार्चला घेण्याचं नियोजन यापूर्वी करण्यात आलं होतं. मात्र ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र विद्यार्थी आणि विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रियांनंतर हा निर्णय मागे घेत परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. 

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतली जाणारी परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयानंतर उडालेली गोंधळाची परिस्थिती पाहून ही परीक्षा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानुसार ही परीक्षा घेण्याचं नियोजन आता पुन्हा नव्याने करण्यात आलंय. त्यासाठी परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी पूर्वपरीक्षा आता २१ मार्च या दिवशी घेतली जाणार आहे. ही परीक्षा १४ मार्चला घेण्याचं नियोजन यापूर्वी करण्यात आलं होतं. मात्र ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र विद्यार्थी आणि विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रियांनंतर हा निर्णय मागे घेत परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

    विद्यार्थ्यांच्या उद्रेकानंतर ही परीक्षा घेण्याची घोषणा गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. शुक्रवारी या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि त्यानंतरच्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार् आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

    कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. एखादी परीक्षा घेण्यासाठी किती करावी लागते, याची आपल्याला कल्पना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. ही परीक्षा शासकीय यंत्रणेचीही परीक्षा असते, असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र अधिवेशन होतं, इतर परीक्षा होतात, तर एमपीएससीच परीक्षा रद्द का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता.

    परीक्षेची नवी तारीख जाहीर झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. परीक्षेच्या तयारीसाठी एक आठवडा अधिक मिळाल्यामुळेदेखील अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. कोरोनाबाबतचे सर्व निकष पाळून ही परीक्षा पार पडणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.