पालिका दवाखान्यात होणार अद्ययावत सुविधा, २ रुग्णवाहिका करणार तैनात

  • पालिका मुख्यालयात बुधवारी २९ जुलै रोजी चिटणीस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ह्या कर्मचाऱ्याची विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत असतानाचा अचानक प्रकृती खालावली. थोड्या वेळाने श्वास घेण्यास त्रास होत होता. आपात्कालीन विभागाला माहिती देऊन तास भराने रुग्णवाहिका आली. नंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुंबई : पालिका मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा निर्माण करण्याच्या मागणीला पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी मान्यता दिली आहे. तातडीने कर्यवाही करुन अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. पालिका मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा निर्माण करण्याची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे सातत्याने करत होते. आता हा दवाखाना अद्ययावत होणार आहे. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या सुविधेसह २ ऍम्बुलन्स देखील तैनात करण्यात येणार आहेत. 

पालिका मुख्यालयात बुधवारी २९ जुलै रोजी चिटणीस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ह्या कर्मचाऱ्याची विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यालयात काम करीत असतानाचा अचानक प्रकृती खालावली. थोड्या वेळाने श्वास घेण्यास त्रास होत होता. आपात्कालीन विभागाला माहिती देऊन तास भराने रुग्णवाहिका आली. नंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे पालिका मुख्यालयातील दवाखान्यात अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्याचा मागणीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी जोर धरला. यावर पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीने अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचे आदेश वेलारासू यांना दिले आहेत. असे यशवंत जाधव यांनी सांगितले.