टाटा कॅन्सर सेंटरला नव्या सदनिका; चोवीस तासात घेतला नविन निर्णय

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता चोवीस तासात बॉम्बे डाईंगमध्ये सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

    मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता चोवीस तासात बॉम्बे डाईंगमध्ये सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

    ‘मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतले आणि सांगितले की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, अशी माहिती आव्हाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

    देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावे लागते. या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण खात्याने घेतला होता. १६ मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आणि तर स्थानिक अमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र्ा पाठवले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घ्ारांच्या वितरणास स्थगिती दिली.

    काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील टाटा रुग्णालयातील 100 कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. आव्हाडांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आलं होतं. मात्र या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता.