कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक, राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा मृत्यू

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५,६४,१२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,१०,४५५ (१९.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,५४,३७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,८४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई : राज्यात ९५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील हा नवा उच्चांक ठरला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३,१०,४५५ झाली आहे. राज्यात १,२८,७३० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रविवारी २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११ हजार ८५४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.८२ टक्के एवढा आहे. 

राज्यात रविवारी २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ६४, ठाणे १९, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली २२, भिवंडी निजामपूर ७, वसई विरार ११, रायगड ८, नाशिक १०, जळगाव ११, पुणे ३०, पिंपरी चिंचवड १५, सातारा ५, सांगली ४, औरंगाबाद ५, नागपूर ७ यांचा समावेश आहे. आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी,राज्यात आजपर्यंत एकूण १,६९,५६९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५,६४,१२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,१०,४५५ (१९.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,५४,३७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,८४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.