मुंबई शहर उपनगरातील नवीन जम्बो कोविड सेंटर दीड महिन्यात सुरु होणार!

तिसऱ्या लाटेत लहानग्यांना होणारी बाधा लक्षात घेत उपायोजनांवर भर देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी लहानग्यांसाठी अधिक बेड राखीव ठेवले जाणार आहेत. सध्या ७५० बेड राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच वेळेनुसार बेड संख्या वाढविली जाणार आहे.

  मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहर आणि उपनगरात तीन नवे जम्बो कोविड केंद्र तयार करण्याची पालिकेची तयारी सुरू झाली आहे, ही सेंटर पुढील दीड महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकड़ून देण्यात आली. यात
  ५००० बेड उपलब्ध होणार आहेत. तसेच ७५० बेड लहान मुलांसाठी रिक्त ठेवण्यात येणार आहेत.

  जुलैमध्ये मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत पालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान शहर आणि उपनगरात तीन नवीन जम्बो कोविड केंद्र सुरू करण्याची पालिकेने घोषणा केली होती, ही केंद्र मालाड, सायन आणि कांजूरमार्ग येथे बनविली जाणार आहेत. सध्या युद्ध पातळीवर केंद्र बनविण्याचे काम सुरू आहे.

  वेळेनुसार वाढणार बेड –

  तिसऱ्या लाटेत लहानग्यांना होणारी बाधा लक्षात घेत उपायोजनांवर भर देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी लहानग्यांसाठी अधिक बेड राखीव ठेवले जाणार आहेत. सध्या ७५० बेड राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच वेळेनुसार बेड संख्या वाढविली जाणार आहे.

  ही जम्बो कोविड केंद्र सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा वेळ लागणार आहे. यात ५५०० बेड असणार आहेत. तर ७० ऑक्सिजन बेड, आयसीयू, एनआयसीयू आणि पीआयईसीयू बेड असणार आहेत.

  - सुरेश काकाणी, पालिका अतिरिक्त आयुक्त