मस्तच! ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात एक हजार रुपये जमा होणार ; नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

नवी मुंबई महापालिकेनं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावं, यासाठी प्रशासनाने विविध योजना तयार करत आहे.

    मुंबई:  देशात कोरोनाने शिरकाव केल्यापासून शिक्षण क्षेत्राचे बारा वाजले आहेत. दरम्यानच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवल्याने अनेक विद्यार्थांना शाळा सोडण्याची वेळ आली आहे. काही खाजगी आणि सरकारी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा (Online Education) पर्याय अवलंबला आहे. पण यामध्ये अनेक अडचणी आहेत.

    अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप (Smart phone and laptop) नाहीत. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोनला रिचार्ज (data recharge) करण्यासाठी पैसेही नाहीत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे.

    आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना डाटा पॅक खरेदी करता यावा, यासाठी महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात १  हजार रुपये जमा करणार आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं आहे