कोविड पश्चात जगाकरिता कोहिनूर ग्रुपकडून नवीन ऑफिस स्पेसेस लाँच

-पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक भागात कोहिनूर वर्ल्ड टॉवर्सची उभारणी

  मुंबई : कोहिनूर ग्रुप हा पुण्यातील अग्रेसर रियल इस्टेट समूह असून आज पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात कोहिनूर वर्ल्ड टॉवर्सची घोषणा करण्यात आली. कोहिनूर वर्ल्ड टॉवर्समध्ये या भागामधील सर्वात मोठ्या व्यावसायिक जागांचा समावेश ज्यामध्ये ए ग्रेड ऑफिस स्पेसेस, हाय स्ट्रीट रिटेल, अलफ्रेस्को आणि पिंपरीतील सर्वोत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध    आहेत.भविष्यातील विकासासह मुख्य प्रकल्प १.८ दशलक्ष चौ. फूट जागेवर विस्तारलेला आहे.

  कोहिनूर वर्ल्ड टॉवर्स (KWT) हा जागतिक दर्जाच्या व्यवसायांकरिता सिग्नेचर लँडमार्क असून जगभरात मापदंड ठरलेल्या कार्यालयीन जागांची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवकल्पकता आणि प्रभावी यांच्या मिलाफ असलेल्या विक्री आणि मनोरंजक विषयक जागा या लक्षवेधी इमारतींमधील प्रमुख घटक आहे. हे टॉवर्स शाश्वत बांधकामाची उच्चतम मानके आणि आयजीबीसी गोल्ड रेटेड बिल्डींग्ससह बांधले आहेत. यांचे पर्यावरणस्नेही, सर्वोत्तम आणि आधुनिक फसाद डिझाईन त्यांना इतरांहून भिन्न करते. याठिकाणी ५ लेव्हल पार्किंग, कॅफेटेरिया, क्लब हाउसेस, रुफटॉप लाउंज, वातानुकुलित लॉबींची सोय आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय अग्निरोधक आणि संरक्षण यंत्रणा, सीसीटीव्ही तसेच स्मार्ट कार्ड एन्ट्रीजची तजवीज करण्यात आली आहे.

  कोहिनूर वर्ल्ड टॉवर्सचे बांधकाम ‘एच’आर्किटेक्चर, या ग्लोबल आर्किटेक्चर फर्मने केले असून जगभरात त्यांच्या संकल्पना आणि डिझाईनकरिता ओळखले जातात. त्यांचे टॉवर डिझाईन हे डोळ्यांना लुभावणारे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. या टॉवर्समध्ये देखील भुरळ पाडणारे लँडस्केपिंग असून प्रवेशद्वारात सुंदर झुडूपवजा हिरवाई कर्मचारी आणि भेट द्यायला येणाऱ्यांचे स्वागत करते. टॉवर्स डिझाईन करताना हरीत क्षेत्र इमारतींचा अविभाज्य भाग असल्याचे लक्षात येते. या इमारती निसर्गाच्या सानिध्यात असल्याची जाणीव करून देतात.

  आपण महासाथीनंतरच्या विश्वात पाऊल ठेवत असून कामाच्या आणि व्यवसाय गरजा लक्षात घेऊन कोहिनुर वर्ल्ड टॉवर्सचे बांधकाम केले आहे. हा केवळ एक पत्ता नसून शहरातील व्यवसायांकरिता एक सिग्नेचर ऍड्रेस ठरणार आहे. आदर्श डिझाईन आणि स्थापत्यशास्त्र यांच्यासमवेत कोहिनुर वर्ल्ड टॉवर्स व्यवसायिक उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत करतील. कनेक्टीव्हिटी पाहिल्यास हा प्रकल्प पिंपरीच्या व्यावसायिक बाजारपेठ, पुणे आणि अन्य शहरी भागाला चांगल्याप्रकारे जोडलेला आहे. ज्यामुळे हा देशातील पथदर्शी प्रकल्प मानला जातो. हे टॉवर्स पीसीएमसी पटलाची आणि त्याच्या व्यवसाय परीघाच्या व्याख्या नव्याने रचतील आणि पिंपरीचा नवीन मापदंड निर्माण करतील”, असे कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल म्हणाले.

  पिंपरी हे राज्यातील मुख्य आर्थिक कामकाजाचे केंद्र म्हणून नावारूपाला येते आहे. इथला वार्षिक वृद्धी दर हा दरसाल १५% याप्रमाणे असून ही आशियाची सर्वात मोठी एमआयडीसी मानली जाते. पिंपरीत ४००० हून अधिक औद्योगिक युनिट असून मर्सिडीज बेंझ, फॉक्सवैगन, जेसीबी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो आणि फोर्स मोटर्स यासारखे बहुराष्ट्रीय वाहन ब्रँड आहेत. या ठिकाणचे हवामान संतुलित असल्याने पिंपरीत मोठे हरीत पट्टे आणि मुबलक आर्थिक संधी आहेत. त्यामुळे निवासी तसेच औद्योगिक कारणांकरिता या ठिकाणाला पसंती मिळत असल्याचे दिसते.

  कोहिनूर ग्रुपविषयी

  कोहिनूर ग्रुप हे पुणे येथील व्यवसाय समूह असून रियल इस्टेट, औद्योगिक उद्यानांचा विकास, विद्यार्थी गृहनिर्माण आणि बांधकाम तंत्रज्ञानात सक्रीय आहे. मागील ३७ वर्षांमध्ये या समुहाने पुण्यातील ६.५ दशलक्ष चौरस फुट जागेचा विकास केला असून ५०००+ आनंदी कुटुंबांकरिता घरकुलाची पूर्तता केली आहे. विद्यार्थ्यांना आवास उपलब्ध करून देणारा त्यांचा ‘युथव्हिला’ या उपक्रमात मुंबई आणि पुण्यात २००० हून बेड्सची क्षमता आहे. सध्या या समूहाकडे पुण्यात ६.५ दशलक्ष चौरस फूट जागा आहे. त्यापैकी ३ दशलक्ष चौ. फुटांहून अधिक जागा विकासाधीन आहे.