सातव्या वेतन आयोगाबद्दल राज्य सरकारने काढला नवीन आदेश

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. सुरुवातीला कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन केला होता. तीन महिने हा लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. त्यामुळे

 मुंबई – देशात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. सुरुवातीला  कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन केला होता. तीन महिने हा लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्याच्या तिजोरिवर याचा खुप मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनच्या काळात उद्योग धंदे बंद असल्यामुळे महसूल गोळा होऊ शकला नाही यामुळे तिजोरीवर मोठा भार पडला आहे, यामुळेच राज्य सरकारने सातवे वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांचा हाप्ता १ वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

हा दुसरा हाप्ता होता आणि तो १ जुलै रोजी देण्यात येणार होता. परंतु आर्थिक चणचण झाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश वित्त विभागाने काढला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना ह्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे. सातवे वेतन हप्त्याची थकबाकी ५ समान हप्त्यामध्ये देण्यात येणार आहे.