आजपासून बंधने लागू ! जाणून घ्या कशाकशाला आहे बंदी !

सध्या सर्व राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुठलीही राजकीय सभा, मोर्चा, मेळावे किंवा इतर कार्यक्रम घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनानं आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे आदेशही देण्यात आलेत. काल (रविवार) झालेल्या बैठकीत पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोनाचं संकट गडद होत असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांसह विदर्भातील काही शहरांमध्ये कोरोना वाढीचा वेग वाढत असल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते, पण नागरिकांनी काळजी घेतली, तर तशी वेळ येणार नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यानी जनतेशी संवाद साधला.

    सध्या सर्व राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुठलीही राजकीय सभा, मोर्चा, मेळावे किंवा इतर कार्यक्रम घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनानं आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे आदेशही देण्यात आलेत. काल (रविवार) झालेल्या बैठकीत पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    आठ दिवसांत चित्र स्पष्ट होणार
    आपल्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढतोय. करोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

    तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक- दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार. असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.