सचिन वाझेच्या चौकशीत दररोज नवीन खुलासे; आणखी काहींवर अटकेची तलवार

एनआयएच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या सचिन वाझेला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांनाही अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. त्याच्या भूमिकेची चौकशी एनआयए करत आहे.

  मुंबई : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या चौकशीत दररोज नवीन खुलासे होत आहेत. गुरुवारी एनआयएने वाझेला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले. वाझे 9 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात आहे. एनआयएला वाझेच्या बँक खात्यात दीड कोटी रुपये मिळाले आहेत. सहायक पोलिस निरीक्षकाच्या श्रेणीत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडे इतके पैसे कुठून व कसे आले. हे पैसे खंडणी वसूल करून कमावलेले आहेत का, याची चौकशी एनआयए करत आहे.

  एनआयएने गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सचिन वाझेला जेजे रुग्णालयात नेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व परत पाठविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. अटक झाल्यानंतर दुसऱ्यांदा त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे.

  आणखी काहींवर अटकेची तलवार

  एनआयएच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या सचिन वाझेला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांनाही अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. त्याच्या भूमिकेची चौकशी एनआयए करत आहे.

  परिवहनमंत्र्यांवर फोडला लेटरबॉम्ब

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसात आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचा दावा वाझे यांनी बुधवारी एका पत्रात केला आहे. तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी त्यांना मुंबईतील 50 कंत्राटदारांकडून 2 कोटी रुपये घेण्यास सांगितले. 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली. नंतर त्याने मनसुख हिरेनची हत्या केली होती. 5 मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंब्राच्या बंदरातील खाडीत सापडला होता.