debit and credit card new rule

बँकेने क्रेडीट, डेबिट कार्ड देताना ग्राहकांना स्थानिक ट्रान्झॅक्शन परवानगी द्यायची आहे. म्हणजे ग्राहकाला गरज नसेल तर एटीएममधून पैसे काढणे व पीओएस टर्मिनल व शॉपिंग साठी विदेशी ट्रान्झॅक्शन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील क्रेडिट आणि डेबिट कार्ड  (credit, debit cards) धारकांसाठी नवे नियम (New rules) जारी केले आहेत. वास्तविक हे नियम जानेवारी २०२० मध्येच तयार केले होते. पण कोरोना मुळे हे नियम त्यावेळी लागू केले गेले नव्हते.

नव्या नियमानुसार क्रेडीट आणि डेबिट कार्ड धारकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार, डोमेस्टिक व्यवहार, ऑनलाईन तसेच कॉन्टॅक्टलस व्यवहार करताना प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. म्हणजे ग्राहकाला हरज असेल तरच सेवा घेता येणार आहे आणि त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

नव्या नियमानुसार ग्राहक स्वतः त्यांची ट्रान्झॅक्शन लिमिट ठरवू शकणार आहे. आठवड्याचे सातही दिवस घेता येईल. तसेच त्याला विदेशी ट्रॅन्झॅक्शन सुविधा कधीही घेता येईल. कार्ड संदर्भातील कोणतीही सेवा अॅक्टीव्हेट करणे किंवा काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा ग्राहकाला मिळणार आहे.