विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम; विमानतळावर दाखवावा लागणार ‘आरटीपीसीआर रिपोर्ट’

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आता लसीचे दोन्ही डोस लागू केल्यानंतरही आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांनाही नवीन नियम लागू होतील,

    मुंबई (Mumbai) : सध्या केरळ आणि महाराष्ट्रात (Kerala and Maharashtra) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे (corona positive patients) जास्त प्रकरणं नोंदवली जातायत. एकीकडे, केरळमध्ये तीस हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर महाराष्ट्रात सात हजारांहून अधिक प्रकरणांची सतत नोंद होताना दिसतेय.

    ही परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने (the Maharashtra government) इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी (passengers) नवीन नियम (new rules) जाहीर केला आहे.

    आता जो कोणी दुसऱ्या देशातून मुंबईत आला तर त्यांना त्यांच्यासाठी कोरोनाचा ‘आरटीपीसीआर’ अहवाल (Corona RTPCR report) त्यांच्यासोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा, राज्यात प्रवेश दिला जाणार नाही. (new rules for passengers coming from other countries)

    जुने नियमही कडक (The old rules are also strict)
    विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आता लसीचे दोन्ही डोस लागू केल्यानंतरही आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. अशा परिस्थितीत आता जुने नियमही अधिक कडक केले गेलेत आणि प्रत्येकाला त्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांनाही नवीन नियम लागू होतील, असंही या आदेशात म्हटलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीनर ही योग्य ती काळजी घेतली जात आहे.