माझगाव डॉकयार्डमध्ये नविन पानबुडी; भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘करंज’

आयएनएस करंज स्टेल्थ आणि एअर इंडिपेंडेंट प्रॉपल्शनसह आणख्ाी काही तंत्रज्ञानाने युक्त आहे. डीझेल-इलेक्िट्रक हे दोन्ही प्रकार आहेत. या पानडुबीची १०० दिवसांपेक्षा जास्त आिण १ हजारांहून अधिक तास समुद्रात राहण्याची चाचणी झालेली आहे. या चाचणीत ही पानडुबी यशस्वी ठरली. आयएनएस करंजमध्ये तळावर आणि समुद्राच्या आता टॉरपीडो आणि ट्यूब लॉन्च्ड अॅन्टी शीप मिसाईल सोडण्याची क्षमता आहे. ‘करंज’ अॅन्टी सरफेस वॉरफेयर, अॅन्टी सबमरी वॉरफेअर, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सक्षम आहे. माइंस पसरवणे आणि एरिया सर्व्हिलान्स सारख्या सैनिकी अभियानांमध्ये ही सबमरीन उपयोगी सिद्ध होऊ शकते.

  मुंबई : देशाची सर्वात घातक, अचूक लक्ष्य असणारी आणि कमी वेळेत शत्रूला नामोहरण करणारी पानबुडी ‘आयएनएस करंज’ बुधवारी भारतीय नौदलात दाखल झाली. नौदलाच्या ताफ्यात ‘करंज’ आल्यामुळे आता समुद्री ताकद वाढली आहे. नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल करबीर सिंह यांच्या उपस्थितीत माजी नौदल अध्यक्ष आणि साेहळ्याचे प्रमुख पाहुणे अॅडमिरल व्ही. एस. शेखावत यांनी माझगाव डॉकयार्डमध्ये आयोजित सोहळ्यात ‘करंज’चे उद्घाटन केले आणि नौदलाला सुपूर्द केले. यावेळी नौदल, पश्चिम कमांडचे चीफ पी. हरि कुमारसह इतर अधिकारी उपस्थित होते.

  नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल करमबीर सिंह यांनी सांिगतले की, चीन आणि पाकिस्तानच्या प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. नौदलाच्या ताफ्यातील पानबुडींची संख्या वाढत आहे आणि आम्ही त्यांच्या दर्जावर विशेष लक्ष देत आहोत. डीआरडीओने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जेणेकरून पानडुबी अधिक कार्यक्षम केले जाऊ शकते, असे ते म्हणाले.

  १०० पेक्षा जास्त दिवस समुद्रात राहण्याची क्षमता

  आयएनएस करंज स्टेल्थ आणि एअर इंडिपेंडेंट प्रॉपल्शनसह आणख्ाी काही तंत्रज्ञानाने युक्त आहे. डीझेल-इलेक्िट्रक हे दोन्ही प्रकार आहेत. या पानडुबीची १०० दिवसांपेक्षा जास्त आिण १ हजारांहून अधिक तास समुद्रात राहण्याची चाचणी झालेली आहे. या चाचणीत ही पानडुबी यशस्वी ठरली. आयएनएस करंजमध्ये तळावर आणि समुद्राच्या आता टॉरपीडो आणि ट्यूब लॉन्च्ड अॅन्टी शीप मिसाईल सोडण्याची क्षमता आहे. ‘करंज’ अॅन्टी सरफेस वॉरफेयर, अॅन्टी सबमरी वॉरफेअर, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सक्षम आहे. माइंस पसरवणे आणि एरिया सर्व्हिलान्स सारख्या सैनिकी अभियानांमध्ये ही सबमरीन उपयोगी सिद्ध होऊ शकते.

  आयएनएस करंजची वैशिष्ट्ये

  • ३५० मीटर खोल पाण्यात जाण्याची क्षमता
  • ३९ अधिकारी, नौसैनिकांची क्षमता
  • वजन १,६१५ टन
  • लांबी ६७.५ मीटर
  • बीम ६.२ मीटर
  • उंची १२.३ मीटर
  • स्पीड – समुद्र तळ २० किमी प्रति घंटा, पाण्याच्या आत ३७ किमी प्रति तास, रेंज १२,००० किमी