Arnab's Republic TV hit internationally, fined Rs 20 lakh

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी कोर्टात १९१४ पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपपत्राची दखल घेऊ नये असा विनंती अर्ज गोस्वामी यांनी दाखल केला आहे.

रायगड पोलिसांनी अलिबाग न्यायलयात दाखल केलेल्या १९१४ पानी आरोपपत्रात पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामीनं न्यायलयात धाव घेतली असून आरोपपत्राची दखल घेऊ नये, असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत, अशी हायकोर्टाला अर्जाद्वारे विनंती केली आहे.

राज्य सरकारची संपूर्ण कारवाई मला लक्ष्य करण्यासाठीच आहे. यासाठी सत्तेचा गैरवापर करत माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप गोस्वामी यांनी अर्जात केला आहे. यामध्ये हस्तक्षेप करून अलिबाग कोर्टाला निर्देश द्यावेत, असं त्यांनी या अर्जात नमूद केलं आहे.