corona

कोरोना रिटर्न्सच्या (Corona Returns) या वृत्तानंतर सगळ्या जगाच्या चिंतेत नवी भर पडली आहे. कोरोनाचा कोप सहन केलेल्या मुंबईकरांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. तूर्सात हे नवे कोरोना संक्रमण आपल्या देशात आल्याचे कोणतेही उदाहरण नसले, तरी नव्या कोरोनाच्या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई : इंग्लंडमध्ये (England) कोरोना पुन्हा परतला असून, या व्हारसने आता आपले स्वरुप बदलले आहे. जुन्या कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)  तुलनेत, नवे संक्रमण हे ७० टक्के अधिक गतीने होत असल्याचे निष्पन्न प्राथमिक तपासात झाले आहे. कोरोना रिटर्न्सच्या (Corona Returns) या वृत्तानंतर सगळ्या जगाच्या चिंतेत नवी भर पडली आहे. कोरोनाचा कोप सहन केलेल्या मुंबईकरांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. तूर्सात हे नवे कोरोना संक्रमण आपल्या देशात आल्याचे कोणतेही उदाहरण नसले, तरी नव्या कोरोनाच्या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोरोना व्हायरसने आता आपले स्वरुप बदलले आहे. हा नवा व्हॅरिंएट VUI-202012/01इंगंलंडमध्ये समोर आला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार हा नवा व्हायरस , जुन्या व्हायरसच्या तुलनेने अधिक वेगाने पसरतो आहे. मात्र यामुळे मृत्युदरात वाढ हील की नाही, याबाबत साशंकता आहे. हा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने इंग्लंडवरुन येणारी विमान वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू असेल. दरम्यानच्या काळात ज्या विमानांनी इंगलंडवरुन उड्डाण केले आहे, त्या विमानातील प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोरोनाची टेस्ट् निगेटिव्ह आली तरी सात दिवस होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नव्या व्हायरसच्या कल्पनेनेही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. गेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं आर्थिक कंबरडं मोड़लं आहे, आता पुन्हा लॉकडाऊन, क्वारंटाईन, रुग्णालयातल्या चकरा नकोत, अशी सर्वसामान्य भावना मुंबईकरांमध्ये आहे. कोरोनाचे संक्रमण आटोक्य़ात आल्याचे दिसत असताना, मुंबई पुन्हा गतीमान होत होती, त्यातच हे नवं संकट उभं ठाकल्याने मुंबईकरांची आणि प्रशासनाची चिंताही वाढली आहे. आता पुन्हा लॉकडाऊन करावे लागले, तर परस्थिती भीषण होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काळजीचा विषय

परदेशातून मिळणाऱ्या माहितीनुसार, व्हायरसची गती आणखी वाढली आहे, हा चिंतेंचा विषय आहे. मात्र हा कोरोनाचा नवा व्हायरस किती घातक असेल, हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. मुंबई आणि देशात नव्या व्हायरसचा रुग्ण अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत सध्या लगेच काहीही सांगणे, ही घाई ठरेल.

डॉ. जलील परकार कोव्हिड स्पेशालिस्ट, लीलावती रुग्णालय

घाबरु नका काळजी घ्या

इंग्लंडमधील प्राथमिक माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार ७० टक्के गतीने होतो आहे. मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होते आहे. जनजीवनही हळूहळू पूर्वपदावर येते आहे. जर कोरोना व्हायरसचा फैलाव गतीने होत असेल, तर परदेशातून येणाऱ्यांवर नजर ठेवावी लागेल आणि नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

डॉ. दीपक बैद अध्यक्ष व कोव्हिड स्पेशलिस्ट एमएमसी