महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी; राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ

मुंबई : बुधवारी राज्यात ५,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पण, कारोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेपेक्षा वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात राज्यात १११ करोना मृत्यूची नोंद झाली आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,३२,१७६ झाली आहे. आज ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १६,९५,२०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ८८,५३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात  बुधवारी १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण १११ मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ३६ मृत्यू  हे पुणे- १०, नागपूर -७नाशिक-५,  औरंगाबाद-४,  ठाणे-३, गोंदिया-२,  अहमदनगर -१,  बुलढाणा – १, पालघर-१, रायगड-१, सांगली-१ असे आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,८९,४९६ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १८,३२,१७६ (१६.६७ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४७,७९१ व्यक्ती होमक्वारंटाईन असून ६,०७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.