Manusakh Hiren Suicide? Manusakh Hiren's last mobile location found; Shocking twist in the case

आर्थिक व्यवहारांची जी माहिती मिळाली आहे, त्या आधारावर एनआयएने हा दावा केला आहे. लाल रंगाच्या तवेरा गाडीत हिरेनची हत्या केल्यानंतर मारेकरी नेपाळला पळून गेला, असे एनआयएने सांगितले. चार मार्चला घोडबंदर रोडवर हिरेनसोबत मारेकरी दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज मिळल्याचे एनआयएमधील सूत्रांनी सांगितले. एनआयए कोर्टासमोर आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी आणि मनिष बसंत सोनी यांना हजर करण्यात आले.

    मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अँटिलिया कार स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे कोडे चार महिन्यानंतरही कायम आहे. याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए करीत आहे. या दोन्ही प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी विशेष कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाखाची व्यवहार झाल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.

    आर्थिक व्यवहारांची जी माहिती मिळाली आहे, त्या आधारावर एनआयएने हा दावा केला आहे. लाल रंगाच्या तवेरा गाडीत हिरेनची हत्या केल्यानंतर मारेकरी नेपाळला पळून गेला, असे एनआयएने सांगितले. चार मार्चला घोडबंदर रोडवर हिरेनसोबत मारेकरी दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज मिळल्याचे एनआयएमधील सूत्रांनी सांगितले. एनआयए कोर्टासमोर आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी आणि मनिष बसंत सोनी यांना हजर करण्यात आले.

    एनआयएने दोन्ही आरोपींची आणखी पाच दिवसांसाठी कोठडी मागितली. 45 लाखाचा जो व्यवहार झाला आहे, त्या आधारावर एनआयएने आरोपींची कोठडी वाढवून मागितली. हिरेनच्या हत्येसाठी इतकी रक्कम मोजल्याचा संशय एनआयएला आहे. मात्र, या हत्येसाठी कोणी पैसा पुरवला? ते एनआयएने सांगितले नाही.