sachin waze

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेपाठोपाठ मुंबई पोलिस दलातील इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे एनआयएचा मोर्चा वळणार असल्याचे संकेत मोदी यांच्या आगमनातून मिळाले आहेत.  सध्या एनआयएच्या अटकेत असलेले वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे समजते. याशिवाय वाझेंच्या वरिष्ठांच्या भूमिकेबद्दलही एनआयएला संशय आहे. त्यामुळेच मोदी मुंबईत आले आहेत. योगेश मोदींनी या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

    मुंबई :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत आले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेपाठोपाठ मुंबई पोलिस दलातील इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे एनआयएचा मोर्चा वळणार असल्याचे संकेत मोदी यांच्या आगमनातून मिळाले आहेत.  सध्या एनआयएच्या अटकेत असलेले वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे समजते. याशिवाय वाझेंच्या वरिष्ठांच्या भूमिकेबद्दलही एनआयएला संशय आहे. त्यामुळेच मोदी मुंबईत आले आहेत. योगेश मोदींनी या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

    योगेश चंदर मोदी हे 1984 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. तसंच मोदींचा कार्यकाळ हा मे 2021 रोजी संपत आहे. 2017 मध्ये वाय. सी. मोदींची एनआयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

    नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्र्यात दंगल झाली होती. त्यावेळी वाय. सी. मोदी पोलिस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना दंगल प्रकरणात क्लीन चीट दिली होती. गोध्रा दंगलीतल्या तीन महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यात नरोडा गाव, गुलबर्ग सोसायटी आणि नरोडा पाटिया प्रकरणांचा समावेश होता.