एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIA चा छापा ; ‘हे’ आहे कारण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

    मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर सकाळी सहा वाजता एनआयए छापा टाकला आहे. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती एनआयए मिळाली आहे. दरम्यान प्रदीप शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.सकाळी ६ वाजल्यापासून प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएची टीम दाखल झाली आहे. स्वतः सीआरपीएफचे डीसीपी या छापेमारी दरम्यान उपस्थित आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलिसांच्या १० ते १२ टीम प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आल्या आहेत.