‘त्या’ स्कॉर्पिओचं आणि ‘या’ इनोव्हाचं कनेक्शन काय? NIA करणार मोठा गौप्यस्फोट

दक्षिण मुंबईतील मायकल रोडवर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर खाली अतरला आणि एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत बसून निघून गेल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा हाच पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा धागा मानला जातोय. या इनोव्हाचा माग काढून प्रकरणातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे. या प्रकरणी एनआयएच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय. 

    दक्षिण मुंबई मुकेश अंबानी राहत असलेल्या परिसरात काही जिलेटिन कांड्या भरलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना सापडली होती. या प्रकरणाचा सध्या एनआए तपास करत आहे. ही स्कॉर्पिओ गाडी त्या ठिकाणी आणून पार्क केल्यानंतर गाडीतील व्यक्ती एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेल्याचं एनआयएच्या तपासात निष्पन्न झालंय.

    दक्षिण मुंबईतील मायकल रोडवर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क केल्यानंतर गाडीचा ड्रायव्हर खाली अतरला आणि एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत बसून निघून गेल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा हाच पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा धागा मानला जातोय. या इनोव्हाचा माग काढून प्रकरणातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे. या प्रकरणी एनआयएच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचं कळतंय.

    सीसीटीव्ही फुटेज सापडल्यानंतर पोलिसांनी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिककडं जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. याच पांढऱ्या रंगाच्या गाडीचं मुुलुंड टोलनाक्यावरचं फुटेजदेखील एनआयएला मिळाल्याचं समजतंय. मुंबई क्राईम ब्रँचनं केलेल्या तपासानुसार स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा या दोन्ही गाड्या एकत्रच मुंबईत आल्याचंही स्पष्ट झालंय.

    मुंबईतील प्रियदर्शनी पार्क या ठिकाणी दोन्ही गाड्या एकाच वेळी थांबल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही गाड्या दक्षिण मुंबईतील मायकल रोडवर आल्या. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ त्याच ठिकाणी पार्क करण्यात आली, तर इनोव्हा गाडी निघून गेली, हे आतापर्यंतच्या सीसीटीव्ही फूटेजमधून दिसून आलंय. आता इनोव्हा गाडीबाबतचे काही महत्त्वाचे धागेदोरे एनआयएला मिळाले असून लवकरच त्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.