वाझेंच्या खात्यातील पोलिस अधिकारी ‘माफीचा साक्षीदार’ होण्यास तयार ! लवकरच होणार सर्व कृत्यांचा पर्दाफाश 

काझी हे वाझे यांचे गुप्त वार्ता विभागातील निकटचे सहकारी होते. वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होती. याशिवाय, वाझे यांच्या सांगण्यावरून काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करून आणल्या होत्या. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास वाझे यांचा कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

    मुंबई : सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील पोलिस अधिकारी रियाझ काझी यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख याच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात ‘माफीचा साक्षीदार’ होण्याची तयारी एनआयएकडे दर्शविल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करण्यास नकार देणारे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचा खेळ आता खल्लास होण्याची चिन्हे दिसत आहेत़.

    काझी हे वाझे यांचे गुप्त वार्ता विभागातील निकटचे सहकारी होते. वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होती. याशिवाय, वाझे यांच्या सांगण्यावरून काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करून आणल्या होत्या. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास वाझे यांचा कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.

    घाटकोपरच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या परभणीच्या ख्वाजा युनूस या अभियंता तरुणाच्या जळीतकांडात या आधी अडकलेले वाझे यांच्यावर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आता अंबानी स्फोटक प्रकरणात वापरलेला सदरा मुलूंड टोलनाक्याजवळ नेऊन केरोसिनने जाळल्याचा आरोप केला आहे.

    गुन्ह्यावेळी वाझे यांनी निरनिराळ्या सदऱ्यांचा वापर केला होता. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता. सीसीटीव्हीमध्ये तो पीपीई किट वाटत होता. मात्र आरोपीने संपूर्ण अंग झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. तसेच बुधवारी रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त एनआयएने जप्त केली आहे.