निफ्टीचा नवा विक्रम, पार केला १४५०० चा टप्पा, सेन्सेक्सची ५० हजारांकडे धाव

भारतीय शेअर बाजाराने नव्या विक्रमाची नोंद केलीय. निफ्टीने १४ हजार ५०० चा टप्पा पार करत १४५५० पर्यंत पहिल्या सत्रात मजल मारली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने कालच (सोमवारी) ४९ हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सची कामगिरी गेल्या काही सत्रांपासून जोरदार सुरू असल्याचं चित्र आहे.

भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनं (Nifty 50) आज (मंगळवारी) १४ हजार ५०० चा ऐतिहासिक पल्ला गाठला. केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर करणार असलेल्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील या नव्या विक्रमाकडे पाहिलं जातंय.

भारतीय शेअर बाजाराने नव्या विक्रमाची नोंद केलीय. निफ्टीने १४ हजार ५०० चा टप्पा पार करत १४५५० पर्यंत पहिल्या सत्रात मजल मारली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने कालच (सोमवारी) ४९ हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सची कामगिरी गेल्या काही सत्रांपासून जोरदार सुरू असल्याचं चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून बँकिंग इंडेक्स असणाऱ्या बँक निफ्टीवर दबाव असल्याचं चित्र होतं. गेले दोन ते तीन दिवस हा निर्देशांक लाल रंगात बंद होत होता. मात्र पहिल्या सत्रात बँकिंग शेअर्समध्येदेखील तेजी आल्याचं दिसलं. त्यामुळे एकूणच शेअर बाजाराचा नूर बदलला आणि बाजाराने नवा उच्चांक गाठला.

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तेजी अशीच कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यानंतर मात्र प्रॉफिट बुकिंगची शक्यता वर्तवली जातेय. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी मात्र योग्य शेअर्समध्ये सर्व बाबींची खातरजमा करून गुंतवणूक करत राहावी, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.