राज्यात पुन्हा ‘नाईट कर्फ्यू’? केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयाने रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यू लागू करण्याचू सूचना राज्य सरकारला केली होती. या पार्श्वभूमीवर, सरकार महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

    मुंबई : महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याबाबत चिंता व्यक्त करीत केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयाने रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यू लागू करण्याचू सूचना राज्य सरकारला केली होती. या पार्श्वभूमीवर, सरकार महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून सावध केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते कौतुकास्पद आहेत. दैनंदिन नवीन कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरापासून राज्यात घट पाहायला मिळत आहे मात्र, काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक खबरदारी घ्यावी लागेल.

    येत्या काळात दहीहंडी आणि गणेशोत्सव यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा धोका पाहता ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना भूषण यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

    राज्यात सध्या सणासुदीचा काळ आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल. राज्यातील लसीकरण मोहीम वेगवान व्हावी, यासाठी अधिक लसमात्रांची गरज आहे. केंद्राकडून अपेक्षित लसमात्रा पुरविण्याचे आश्वासन मिळाले आहे. सणासुदीच्या काळात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळा.

    - राजेश टोपे, आरोग्यमंत्री