पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन Jumbo Block तर मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज Mega Block; घराबाहेर पडण्याआधी ही बातमी एकदा वाचाच

कल्याण (Kalyan) येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा व ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

  मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात (Central Railway, Mumbai Division) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repairs And Maintainance Work) आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) कार्यान्वित करण्यात आला असून पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  ठाणे- दिवा (Thane-Diva) अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत

  मुलुंड (Mulund) येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणारी डाऊन मार्गावरील धीमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येऊन ठाणे, दिवा स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

  कल्याण (Kalyan) येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा व ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT, Mumbai) येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने आगमन होतील/सुटतील.

  हार्बर मार्ग

  पनवेल-वाशी (Panvel-Vashi) अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

  (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील)

  पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणेकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी डाऊन मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

  ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील.

  ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

  पश्चिम मार्ग

  माहीम – मुंबई सेंट्रल (११.५० वाजल्यापासून ते पहाटे ०४.५० वाजेपर्यंत)

  पश्‍चिम रेल्वेतर्फे माहिम जंक्शन (Mahim Junction) आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान (Mumabi Central) अप धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) ११.५० वाजल्यापासून ते पहाटे ०४.५० वाजेपर्यंत २ तारखेच्या रात्रीपासून ते ३ तारखेच्या पहाटेपर्यंत घेण्यात येणार आहे.

  ब्लॉक कालावधी दरम्यान, सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या माहीम जं आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या वळलेल्या गाड्या माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानासाठी विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची परवानगी आहे.

  या ब्लॉकमुळे, उपनगरीय सेवा क्रमांक BVI 91297 चर्चगेट स्थानकातून १.०० वाजता सुटणार होती, ती पुढे ढकलण्यात येईल आणि चर्चगेटहून १.२५ वाजता सुटेल. पुढे ते VR 91256 च्या कनेक्शनसाठी मुंबई सेंट्रल स्टेशनवर नियमन केले जाईल. या संदर्भात सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.