अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर..; निलेश राणेंचा इशारा 

फार कमी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, तरी पण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवार यांचं नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी ट्विटरवरुन दिला.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यानंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दांत अजित पवारांनी (Ajit Pawar) निलेश राणेंवर हल्लाबोल चढवला. परंतु अजित पवार साहेब, तुमची भाषा नीट करा, नाहीतर एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

काय म्हणाले निलेश राणे ?

फार कमी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांना अनेक वर्ष मंत्रिपदं मिळाली, तरी पण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवार यांचं नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब, भाषा नीट करा तुमची, नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी ट्विटरवरुन दिला.

निलेश राणे काय म्हणाले होते?

‘काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा. सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं’ असं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकमधील निवासस्थानी घेतलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी संताप व्यक्त केला होता.