निलेश राणेंची अदित्य ठाकरेंवर खोचक टीका, लाज असेल तर राजीनामा दे…

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर 'मंत्री' पदाचा उल्लेख काढून टाकल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचे धनी करण्यात आले आहे. हा उल्लेख आताच्या परिस्थितीमध्ये काढून टाकण्यात आल्याची टीका देखील व्हायरल होत आहे.मु

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू तपास प्रकरणावर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद होत आहेत. दरम्यान युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर संशयाचे बोट आहे. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेखही या प्रकरणात नसला तरी विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी केले आहे. निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर ‘मंत्री’ पदाचा उल्लेख काढून टाकल्याच्या आरोपामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेचे धनी करण्यात आले आहे. हा उल्लेख आताच्या परिस्थितीमध्ये काढून टाकण्यात आल्याची टीका देखील व्हायरल होत आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावर पेचात पकडले आहे. यावर त्यांनी बोचरी टीका करत म्हटले आहे की, शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही. खरु पुरुष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो, अशा आशयाचे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. आता या टीकेला आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे.