Nilesh Rane's venomous criticism after Uddhav Thackeray's talk of becoming Prime Minister

उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करतील आणि देशाचं वाटोळं लावतील, असे ही निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर आता शिवसेनेला पंतप्रधान पदाचे वेध लागले आहेत. शिवसेनेचा पंतप्रधान झालाच पाहिजे असे मत  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धारही संजय राऊत यांनी बोलून दाखवला आहे. यानंतर माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करतील आणि देशाचं वाटोळं लावतील, असे ही निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

ट्विट करत निलेश राणेंनी टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.