…त्यासाठी अब्रू असावी लागते; ठाकरेंचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाईंवर निलेश राणेंची जहरी टीका

“ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा” असे ट्विट निलेश राणेंनी केलेय.

    मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात एपीआय सचिन वाझेंना अटक झाली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीच सापडले असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावरुनच राणे बंधूनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली आहे.

    “ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा” असे ट्विट निलेश राणेंनी केलेय.

    “ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार”, असा इशाराही निलेश राणे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

    दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केला आहे. राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे असे सरदेसाई म्हणाले.