विक्रोळीत कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात आज ९ कोरोनाबाधितांची नोंद

विक्रोळी : विक्रोळी विभागातील कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोनाबाधितांची रुगणांची संख्या आता १०० पार झाली असून त्यातच कोरोना बाधित मृतांचा आकडा देखील १० च्या वरती गेला आहे. त्यामुळे सर्वत्र

विक्रोळी : विक्रोळी विभागातील कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोनाबाधितांची रुगणांची संख्या आता १०० पार झाली असून त्यातच कोरोना बाधित मृतांचा आकडा देखील १० च्या वरती गेला आहे. त्यामुळे सर्वत्र परिसरात भीतीचे वातावरण असताना आज पुन्हा नवे ९ रुग्ण कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात आढळून आले आहेत. त्यातील टागोरनगर ग्रुप नंबर १ याच एकाच परिसरात ३ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्या सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आले आहे . खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे तो परिसर आता सिल केला आहे.