भिवंडीतून नववी विशेष श्रमिक ट्रेन मधुबनी बिहारसाठी रवाना

भिवंडी : लॉकडाऊनमुुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी बिहार मधुबनीसाठी नववी विशेष

भिवंडी : लॉकडाऊनमुुळे भिवंडीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची योजना आखण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी बिहार मधुबनीसाठी नववी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली. या ट्रेन मधून १६५० प्रवासी बिहार मधुबनीसाठी रवाना झाले. यापूर्वी देखील अशाच प्रकारे बिहार मधूबनी साठी विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. तर त्याआधी गोरखपूर, जयपुर, आणि पटनासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड,नायब तहसीलदार महेश चौधरी यांनी टाळ्या वाजवत  कामगारांना निरोप दिला.