‘सामनाची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..’ – नितेश राणेंचा ट्विटमधून इशारा

संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले.

    भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी शिवसेना(Shivsena), संजय राऊत(sanjay Raut) आणि महाविकास आघाडीवर(Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. राजगुरूनगर इथं भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले. ते नेमके शरद पवार यांचे आहेत की उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही. शिवसेनेनं खेळ सुरु केला होता, आता आम्हाला आमच्या पद्धतीनं खेळ संपवावा लागेल, असंही नितेश राणे म्हणाले. तसेच त्यांनी आज ट्विटद्वारेही शिवसेना आणि संजय राऊत यांना सुनावलं आहे.

    नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..
    काही “आडनाव” ऐकली..कि शिवसेना लगेच गोड होते.. आमच्या देवेंद्रजींची १० मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..युतीची आठवण येते..सगळ एकदम गोड गोड..म्हणून नेहमी सांगतो..चड्डीत राहायचं!!!”

    सध्या राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दोन्हीकडून आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत.