“इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या उत्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अशा शब्दांत उत्तर दिलं. यावरुन इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

राज्यातील मंदीरं खुली (Temple Reopen)  करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून काल मंगळवारी राज्यभर आंदोलन (Agitation) करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या उत्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अशा शब्दांत उत्तर दिलं. यावरुन इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे

नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली.


नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”.