राऊतांनी शिवभोजनाची भाषा करु नये, मैदानात यावे – आमदार नितेश राणे यांचा इशारा

राऊतांनी(Sanjay Raut) शिवभोजनाची भाषा करू नये. मैदानात यावे. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी दिला आहे.

    मुंबई: शिवप्रसाद(shivprasad) देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतांची अवस्था काय झाली होती हे सांगायला नको. राऊतांनी(Sanjay Raut) शिवभोजनाची भाषा करू नये. मैदानात यावे. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी दिला आहे.

    शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर राडा झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिला, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असा इशारा भाजपला दिला होता. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    शिवसेना हीच कॉमन लिंक
    आमदार नितेश राणे म्हणाले की, अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय ? माध्यमांशी बोलताना आमदार राणे म्हणाले की, अटक होणाऱ्या किंवा चौकशी होणाऱ्या सर्वच शिवसेना नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जात आहेत. या सगळ्यांमध्ये शिवसेना हीच कॉमन लिंक आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेतून विधानसभा लढवली आहे. मूळ मुद्दा एवढाच आहे की या सर्व प्रकरणाशी शिवसेनेचा संबंध काय आहे? वाझेंचे गॉडफादर कलानगरला बसले आहेत काय?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

    मुख्यमंत्रीही बाजू घेत होते
    ते म्हणाले की, सगळ्या संशयाच्या सुया एकाच दिशेने जात आहेत. या मागचा मास्टरमाईंड कलानगरला बसला आहे. एनआयएने डायरेक्ट कलानगरमधून चौकशी सुरू करावी. कलानगरात मनसुखचे मुख्य आरोपी आहे. तिथे हेड क्वॉर्टर आहे, असा दावाही त्यांनी केला.

    ते म्हणाले की, अनिल परब हे वाझेंचे बॉस आहेत. ते वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असे मुख्यमंत्री म्हणत होते. अधिवेशनात आम्हाला काय करायचे ते करू, ज्या गोष्टी करणे  गरजेच्या आहेत, त्या करणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.