शिवसेना भवनासमोरील त्या राड्यावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाही. मुंबई ही आमचीसुद्धा आहे. त्या दृष्टीकोनातून भाजपच्या विविध कार्यालयाचे उद्घाटन आहे. निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आजचा दौरा आहे. यामध्ये कोणाचा बालेकिल्ला असो किंवा नसो भाजप कसा वाढेल यासाठी ही आमची सुरुवात आहे, असे भाष्य नितेश राणे यांनी केले.

    मुंबईमध्ये दादर Dadar Mumbai येथे भाजपच्या BJP Office कार्यालयाचे आज उद्घाटन झाले. यानिमित्त भाजप नेते नितेश राणे Nitesh Rane यांनी शिवसेनेवर टीका केली. पत्रकारांनी “याच चौकात आधी सेना-भाजप झाला होता. आपा परत भाजप सेनेला डिवचण्याचं काम करतेय का?” असा प्रश्न विचारला असता. “तो राडा नव्हता झाला, आम्ही चोपलं त्यांना. तुमचा प्रश्न चूकीचा आहे.” असं नितेश राणे यांनी म्हटलं.

    मुंबईच्या प्रॉपर्टीकार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाहीये

    मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहलेलं नाही. मुंबई ही आमचीसुद्धा आहे. त्या दृष्टीकोनातून भाजपच्या विविध कार्यालयाचे उद्घाटन आहे. निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आजचा दौरा आहे. यामध्ये कोणाचा बालेकिल्ला असो किंवा नसो भाजप कसा वाढेल यासाठी ही आमची सुरुवात आहे, असे भाष्य नितेश राणे यांनी केले.

    शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस

    मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

    मरेपर्यंत आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक!

    ‘राणे शिवसैनिक आहेत’ या संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत आहे. हो आम्ही शिवसैनिकच आहोत आणि मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत. त्याचा आम्हाला अभिमानही आहे पण संजय राऊतांचं काय? ते शिवसैनिक आहेत की शरद पवारांचे सैनिक आहेत हे त्यांनीच सांगावं. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत अशी ओळख जाहीरपणे सांगतोय पण ते तसं सांगू शकणार नाहीत. कारण ते शिवसेनेचं नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करत आहेत’, अशा शब्दांत नितेश राणे यांनी निशाणा साधला.